जिल्हा परिषद हायस्कुल शिक्षकांची वेतनाविना उपासमार
तीन महिन्यापासून वेतन रखडल्यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम
गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जि. प.हायस्कुल आस्थापणेतील कार्यरत शिक्षकांचे वेतन मागील तीन महिन्यापासून झाले नसल्याने परिणामतः गृकर्ज, विमा हप्ता,वाहनकर्ज, सोसायटी कर्ज,थकलेले आहे.व त्यावर अतिरिक्त व्याज बसत असल्याने त्यामुळे अधीकचा शिक्षकाना आर्थिक भार सोसावे लागत आहे.व त्यांच्या दैनंदिन गर्जावर विपरीत परिणाम होत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
मागील नोव्हेंबर महिन्यापासून 10 जिल्हा परिषदेच्या हायस्कुल मधील कार्यरत शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. विशेषतः जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन झालेले असून माध्यमिक शिक्षकांच्या वेतनास इतका उशीर का? असा नाराजीचा सूर शिक्षकांमध्ये आहे.तरी त्यांच्या कुटुंबियांचा व मानसिकतेचा विचार करून करून त्यांचे वेतन नियमितपणे दयावे.जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार नाही.