माशाने घेतला वृद्धाचा बळी चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
चंद्रपूर जि. प्र.
मासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाला मासोळीच्या शेपटीचा फटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सातारा येथे घडली. आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सातारा येथील तुकाराम कोडापे वय 70 नेहमीप्रमाणे मच्छिमारी करण्याकरिता गावाशेजारी असलेल्या टेकेपार येथील मामा तलावात आपल्या सहकारी बांधवासोबत मासेमारीसाठी गेला. तुकाराम कोडापे व त्याचे सहकारी मासे पकडण्यासाठी तलावात उतरले मात्र यावेळी मोठ्या माशाने तुकाराम यांच्या छातीवर जोराचा प्रहार केला.हा आघात सहन न झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.