राखीव प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारणे करीता विशेष मोहिम

45

*राखीव प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारणे करीता विशेष मोहिम*

 

 

गडचिरोली,(जिमाका)दि.21:- सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यांनतर वैधता प्रमाणपत्राबाबत सामान्यत: 3 ते 5 महिन्याचा आत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विद्यार्थ्यांनी 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यानी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताऐवज MH-CET, JEE, NEET, B.ED CET, M.ED CET, LLB CED, B.SC AGRI CET, व MBA CET या सारख्या इतर प्रवेश पात्रता परीक्षकरीता भरण्यात आलेल्या अर्जाची प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय.चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्पलेस,गडचिरोली, या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. असे आवाहन उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी केले आहे.