*विवाह सोहळा म्हणजे काळाची गरज…. माजी जि. प .सदस्य प्रमोद चिमुरकर*
किन्ही येथे रामनवमी उत्सव व भागवत कथेचा समारोप..
ब्रह्मपुरी….
ग्रामीण भागात जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. मात्र त्याचा गांभीर्याने कोणीही उपयोग करून घेत नाही.
आजच्या युगात लग्न सोहळा म्हटलं की लाख रुपयाचा खर्च येतो. शिवाय एखाद्या रामनवमी उत्सव उत्सव असो की भागवता सारख्या आध्यात्मिक कार्यक्रमातून विवाह सोहळा संपन्न होत असेल तर ती काळाची गरज असून लग्नात होणारा लाख रुपये खर्च आपल्याला बचत निश्चितच करता येईल व एरवी येणारा लाख रुपया खर्च वाचवता येईल त्यासाठी अशा सामूहिक विवाह सोहळ्याची नितांत गरज आहे असे मौलीक प्रतिपादन *माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर* यांनी मांडले ते किन्ही,(बेटाळा) येथील श्रीराम मंदिराच्या सभा मंडपात आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळा श्रीमद् भागवत सप्ताह समारोप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर शेलोकर, विशेष अतिथी म्हणून ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, काँग्रेस तालुका कार्यालय प्रमुख सुधीर पंदीलवार, किसान सेलचे तालुकाध्यक्ष नानाजी तूपट, विठ्ठल तुंबडे, खरकाटे बाबासाहेब, किन्ही सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश दर्वे, माजी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर ढोरे, पत्रकार विनोद दोनाडकर, माजी सरपंच पुंडलिक प्रधान, किन्ही येथील सरपंच धीरज गोपाल धोंगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनुप प्रधान, उपसरपंच अशीच प्रधान खरकाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच ताराचंद पारधी, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, किशोर राऊत, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी मंचावर उपस्थित होते
आजच्या आधुनिक युगात अध्यात्म हा एक सत्कर्माचा मार्ग असून त्यापासून एक नवीन पिढी भविष्यात आदर्श निर्माण करेल त्यासाठी असे धार्मिक कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मौलिक विचार काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष खेमराज तिडके यांनी मांडले. तर जीवनात प्रपंच परमात्मा सोबतच भागवत सप्ताह असो की तर आध्यात्मिक कार्यक्रम असोत त्यात असे विवाह सोहळयायाचे कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे भविष्यात गरीब कुटुंबासाठी होणारी पैशाची बचत निश्चित पारदर्शक आहे असे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर शेलोकर यांनी मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गेले 31 वर्षाची परंपरा आजही या मंडळांनी कायम ठेवली असून नेहमीच असे कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने होत राहील असा आशावाद सुरेश दर्वे यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भर्रे तर आभार कृष्णा खरकाटे यांनी मांनले