*स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*गौरव यात्रेत हजारो महिला व नागरिकांची उपस्थिती*
गडचिरोली:- दि. 5 एप्रिल
*भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या सन्मानार्थ गडचिरोली शहरातून गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवराव होळी व भाजपचे जिल्हा महामंत्री तथा गौरव यात्रेचे संयोजक प्रमोदजी पिपरे, भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा काढण्यात आली.*
*या रॅलीमध्ये ढोल ताशाचा गजर, आदिवासी नृत्य, विविध झाक्या व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विचारांचे प्रेरणादायी पोस्टर बॅनर लावण्यात आले होते या गौरव यात्रेत विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गडचिरोली शहरातील नागरिक महिला व युवकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला सदर गौरव यात्रा इंदिरा गांधी चौक ते चंद्रपूर रोड ते मार्केट लाईन, गांधी वार्ड, वंजारी मोहल्ला ते आरमोरी रोड फिरून गांधी चौकात यात्रेचा समारोप करण्यात आला. व गांधी चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन व प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला.*
^ *कार्यक्रमाचे* *अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. जिल्हासंघ चालक श्री घिशुलालजी काबरा होते*
*प्रमुख वक्ते म्हणून नागपूरचे स्वातंत्र्यवीर सावरकर विचारक प्रसादजी बर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे* *प्रास्ताविक गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले कार्यक्रमाचे संचालन श्री प्रशांत भ्रुगवार यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी केले*
*या भव्य गौरव यात्रा व प्रबोधन कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे श्री रामायन जी खटी, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्राचे संघटन सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांतमंत्री श्री शक्तीजी केराम, श्री भारतजी खटि,जिल्हा उपाध्यक्ष, युवा मोर्चाचे महामंत्री मधुकरजी भांडेकर, भाजपाचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके,गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास जी देशमुखे, शहर युवा मोर्चाचे हर्षल गेडाम, विश्व हिंदू परिषदेचे बंटी खडसे, शिवसेनेच्या अमिता मडावी, भाजपाच्या प्रतिभाताई चौधरी, विलास पाटील भांडेकर, शहर महिला अध्यक्ष सौ. कविता उरकुडे प्रामुख्याने उपस्थित होते*