जिल्हयातील विविध समस्यांवरही चर्चा :
जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामांची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी व इतर विकास कामांमधील अडचणींवर उपसिथत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी वन विभागाकडून आवश्यक असलेल्या मंजूरी वेळेत देणेबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले. आदिवसी व दुर्गम भागातील विकास प्रक्रियेत वन विभागाकडून अडचणी निर्माण होता कामा नये तसेच जिल्हयाचा विकास करून नक्षलवाद कमी करायचा आहे. यासाठी सर्व विकासाठी लागणाऱ्या परवानग्या तातडीने द्याव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हयातील धान खरेदी बाबत असलेल्या अडचणीवरही चर्चा झाली. वन पट्टेधारक शेतकऱ्यांच्या धान खरेदीमधील अडचणी राज्य स्तरावरून सोडविण्यात आले आहेत. त्यांचे धान खरेदी ऑनलाईन होत असल्यामूळे त्यामध्ये काही अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्या आहेत. तसेच अतिक्रमण्रा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे धान खरेदीबाबत शासनाला प्रस्ताव पाठवून त्यावरही तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.