*मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला जय-भिम नामाचा गजर…!* *शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन

25

*मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला जय-भिम नामाचा गजर…!*

 

*शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन.*

 

परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श जोपासून वाटचाल करावी.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गिलगाव, अमिर्झा, टेंभा, कळमटोला, आंबेशिवणी, गिलगाव, आंबेटोला येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मौशिखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात सर्वच गावातील कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य गावा-गावात उत्साहाचे वातावरण पसरले होते. जय भिम नामाच्या जयघोषाने गाव परिसर दुमदुमून गेला.

मागील दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने शासनाने सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लावले होते. यावर्षी कोरोनाचे निर्बंध काढण्यात आल्याने मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समाज बांधवांनी सर्वत्र जल्लोषात परमपूज्य बाबासाहेबांची जयंती साजरी करून त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले. गावात निळे ध्वज, निळ्या पताका व जय-भिम चा जयघोषाने मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या गावातील वातावरण भिममय झाले होते.

कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रवाटर म्हणाले की, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा व त्यांचे कार्य हे केवळ आपल्या भारत देशापुरतेच नव्हे समस्त जगासाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांनी समाजातील दीनदुबळ्याच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या कार्यामुळे आज बहुजन समाजाला न्याय, हक्क मिळून सन्मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी व आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वप्रथम काटेरी मार्गाचा सामना करावा लागतो. तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकतो. शिक्षण हे यशस्वी जीवनाचा महत्वपुर्ण भाग आहे. त्यामुळे प्रत्येकांनी शिक्षण घेऊन विद्याभूषीत बनले पाहिजे. जीवनात सहजासहजी काहीच प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतोच. त्यामुळे परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जोपासून समाजबांधवांनी वाटचाल करावी आणि समाजाचा विकास घडवून आणावा. देशात समता व बंधुत्वता निर्माण होण्यासाठी परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला महत्वपुर्ण अशी राज्यघटना अर्पण केली. राज्यघटनेत सर्वांना न्याय, हक्क अधिकार बहाल करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेतील तरतूदीची प्रभावी अंमलबजावणी होऊन सर्वांना न्याय , हक्क, अधिकर प्राप्त झाला पाहीजे, असेही शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. या प्रसंगी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, विभाग प्रमुख संदिप भुरसे, विभाग प्रमुख संजय बोबाटे, प्रशांत ठाकुर, डोमेंद्र भैसारे, प्रविण टेंभुर्णे, ओम भैसारे, संदिप भैसारे, ईश्वर सोरते, यशवंत भैसारे, हंसराज सोरते, दिवाकर भैसारे, भुमेश्वर अंबादे, प्रदिप सोरते, सोमेश्वर सहारे, प्रेमा अंबादे, सुरेश वाघमारे, लंकेश वाघमारे, गौरव उंदिरवाडे, देवेंद्र जांभुळकर, सुनिल उंदिरवाडे, अरविंद जांभुळकर, सुरेश उंदिरवाडे, जितेंद्र टेंभुर्णे, प्रफुल उंदिरवाडे, संजय भैसारे, विकास उंदिरवाडे, रविंद्र ढवळे, विलास भैसारे, आकाश ढवळे, विश्वनाथ उंदिरवाडे, गुलाब टेंभुर्णे, अतुल राऊत, माणिक भैसारे, गणेश खंडारे, प्रकाश उंदिरवाडे, जीवन नंदेश्वर, सुभाष खंडारे, मोरेश्वर फुलझेले, उद्धव खोब्रागडे, उमाजी बोरकर, विलास खोब्रागडे, मेघनाथ फुलझेले, वसंत नगराळे, मोहन डोंगरे, पंढरी उंदिरवाडे, सुधीर राऊत, हिराचंद ढोलणे, नारायण साखरे, गजानन सहारे, अशोक उंदिरवाडे, अजय रायपूरे, विलास बांबोळे, राहुल मेश्राम, प्रदिप बांबोळे, लुमाजी रायपूरे, प्रविण मेश्राम, हिरामण लोणारे, गुलचंद बांबोळे, राजेंद्र भैसारे, विश्वनाथ सहारे, नाजुक भैसारे, गौतम सहारे, लोमेश भैसारे, काशिनाथ राऊत, हिवराज भैसारे, एकनाथ राऊत, तुकाराम ढवळे, निलम राऊत, किशोर ढवळे, हरिदास नंदेश्वर, सदाशिव उंदिरवाडे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, राजू जवादे, अरुण बरपात्रे, संजय मेश्राम, नेकेश लोहंबरे, दशरथ चापले यांच्या सह गावातील समाज बांधव व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.