*स्वतःचा बचाव व संरक्षण करण्यासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन*…
———————————————–
राजे छत्रपती गडचिरोली जिल्हा कराटे पुरस्कार २०२३ या सोहळ्याचे उदघाटक खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न…..
———————————————–
दिं..१६ एप्रिल
गडचिरोली जिल्हा ॲम्युचर क्रिडा कराटे-डो- असोशिएशन व शोतोकान कराटे इंटरनॅशनल ऑफ इंडिया च्या वतीने तसेच असोसिएशन्स या संघटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याने रोप्य महोत्सवी उत्कृष्ट कराटे खेळाडू सत्कार सोहळा. सिटी हार्ट हॉटेल, गडचिरोली. येथे आयोजित करण्यात आला.
या सोहळ्याच्या उद्घाटन स्थानावरून खासदार अशोकजी नेते यांनी प्रतिपादन करतांना आपण भरपूर खेळ खेळतो जसे कि, क्रिकेट, बास्केटबॉल,फुटबॉल,कबड्डी अशा खेळाबद्दल आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु काही खेळ असे आहेत जे लढायला आणि स्वतःच रक्षण करायला शिकवतात ते म्हणजे कराटे. कराटे हा एक असा खेळ आहे ज्याचे प्रशिक्षण स्वतःच्या रक्षणासाठी घेतल्या जाते. त्याकरिता स्वतःचं बचाव व संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे.मी हि स्वतः एकेकाळी कबड्डीचा खेळाडू होतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या खेळाची आवड असते.कराटे हा एक खेळ नसून त्याचे स्वयंरक्षांकरिता प्रशिक्षण घेतले जाते.परिणामी ते आपला बचाव करतात.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी या प्रसंगी केले.
तसेच यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रशांतजी वाघरे यांनी बोलतांना कराटे हा एक लढाऊ शारीरिक क्रियाकलाप असण्याबरोबरच, कराटे अत्यंत कुशल आणि रणनीतिकखेळ आहे आणि कराटे स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सर्व स्पर्धकांकडे उच्च स्तरावरील कौशल्य, अनुभव, वेग आणि कौशल्य असणे आवश्यक आहे.कराटे या खेळात खेळाडू शस्त्राविना खेळतो. आणि शस्त्राविना स्वतःचे संरक्षण करतो
असे मौलिक मार्गदर्शन याप्रसंगी केलेे.
शब्द पडतील अपुरे,अशी शिवबांची कीर्ती, राजा शोभूनी दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती !!
या नुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला खासदार महोदयांनी माल्यार्पण दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,जिल्हा महामंत्री तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांतजी वाघरे,सामाजिक नेते अविनाश वरगंटिवार,पत्रकार रुपराज वाकोडे,पोलीस निरीक्षक राहुल नामदे,वाहतूक निरीक्षक पूनम गोऱ्हे मॅडम,कार्यक्रमाचे आयोजक योगेश चव्हाण सर,रहीम पटेल सर ,तसेच कराटे प्रशिक्षण खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.