*अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करतांना*…
*खासदार अशोक नेते*..
——————————————
*खासदार अशोक नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर*……
दि.२३ एप्रिल २०२३
सावली:- तालुक्यातील मागील चार दिवसांपासून सततच्या वादळी वाऱ्यासह अकाली पावसामुळे कहर केलेला असून यामध्ये शेतकऱ्यांचा फार मोठया प्रमाणात शेत पिकांचा नुकसान झालेला आहे.या संदर्भात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांनी सावली तालुक्यातील व्याहाड बुज,सामदा, सोनापूर, वाघोली बुटी या परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी दुय्यम पीक म्हणून मक्का या पिकाची लागवड केलेली होती. परंतु शेवटच्या क्षणी हातावर आलेल्या मक्का या पिकांचे अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने मक्का या पिकांचे निस्तानाभूत करून फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याची पाहणी करण्याकरिता खासदार अशोक नेते यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
शेतकऱ्यांसोबत पिकांच्या नुकसान बाबत चर्चा केली असता त्यावेळी शेतकऱ्यांनी खासदार महोदयांपुढे आपल्या व्यथा मांडतांना साहेब आम्ही शेतकरी हातात पिक येण्यासाठी किंवा उत्पादन मिळण्यासाठी राबराब राबतो.परंतु हातात पिक येत नाही त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी रानटी डुकर सुद्धा पिकांचा हैदोस करून पिक नष्ट करतात. तर एकीकडे वाघाची दहशत वाघाच्या भीतीने सुद्धा पिकांकडे दुर्लक्ष होतो.अशातच निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांवर कोपुन अशातच अवकाळी वादळ वाऱ्यांसह पावसाने शेतकऱ्यांच पीक नष्ट करून टाकला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था काय असते असे मार्मिक व्यथा शेतकऱ्यांनी खासदार नेते यांच्याकडे मांडली.
मान. खासदार महोदयांनी शेतकऱ्यांचे विचार व व्यथा ऐकूण घेऊन शेतकऱ्यांविषयी संवेदशील विचार व्यक्त करत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तशा सुचनाही संबंधित अधिकारी वर्गांना देण्यात आले.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी राज्याचे वनेमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सोबत वार्तालाप करत परिसरातील वाघ,बिबट,डुकर यांच्यावर बंदोबस्त उपाय योजना करण्यासाठी व झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच याप्रसंगी अधिकारी वर्गांना सुध्दा यासंबंधीत पिकांची पंचनामे करून, पंचनाम्यात हायगय न करता किंवा दुधाभाव न करता ज्या शेतकऱ्यांनी मक्का पिकांची लागवड केली आहे.अशाच पीकांचा योग्य पंचनामा करून तात्काळ शासनास पाठवावे.असे निर्देश याप्रसंगी अधिकाऱ्यांना दिले.
खासदार नेते यांनी शेतकऱ्यांविषयी गांभीर्याने लक्ष वेधत अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने केलेल्या पिकांच्या नुकसानी बाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे पाठपुरावांनी करीत शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल असे शेतकऱ्यां समोर संबंधित मागणी केली.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,माजी पं.स. उपसभापती रविंद्र बोल्लीवार, डॉ.तोडेवार,माजी सरपंच देवानंद पाल,उपसरपंच नितीन कारडे, ग्रा.प.सदस्य दिवाकर गेडाम, ग्रा.प. सदस्य धनराज गुरूनुले,अरविंद निकेसर,विनोद तोडेवार,नायब तहसीलदार कांबळे साहेब,तालुका कृषी अधिकारी अश्विनी घोडसे, सावली पोलीस स्टेशनचे मडावी, वनविभागाचे अधिकारीवर्ग, व्याहाड बुज.सांजाचे पटवारी मॅडम,ज्ञानेश्वर निकोडे,कानूजी गेडाम,तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते.