चौगान येथे बुध्द जयंती उत्सव उत्साहात साजरा* *माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*

54

*चौगान येथे बुध्द जयंती उत्सव उत्साहात साजरा*

 

*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*

 

ब्रम्हपुरी/

तालुक्यातील चौगान येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दीपस्तंभ फाऊंडेशन चौगान यांच्या वतीने बुध्द जयंती उत्सव व मारोती चहांदे नागपूर प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे *उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.* तर सह उद्घाटक म्हणून जय बजरंग बली राईस मिल चौगानचे मालक तथा चौगान ग्रामपंचायतचे सदस्य पंकजभाऊ तिडके उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ब्रह्मपुरीचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रेमलाल मेश्राम तर उपाध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ब्रह्मपुरीचे तालुकाध्यक्ष सुखदेव प्रधान उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उमेशभाऊ धोटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी तथा सरपंच चौगान, प्रा. अंकुशभाऊ मातेरे उपसरपंच चौगान, प्रा. प्रमोद मैंद प्राचार्य कृषक विद्यालय चौगान, नामदेवजी लिंगायत मुंबई, निराहरजी शिवणकर मुंबई, प्रफुल ढोक समता सैनिक दल ब्रह्मपुरी, हिरालालजी बनसोड सर, शुद्धोधन शिवणकर, रंजूताई मेश्राम अध्यक्ष रमाई महिला मंडळ चौगान, अखिल कांबळे अध्यक्ष बौद्ध समाज चौगान व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला ज्ञान, विवेक आणि सत्याचा मार्ग दाखवला. भगवान गौतम बुद्ध यांनी असे सांगितले होते कि, सत्य पालन हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. त्यांनी सत्य, अहिंसा आणि शांती याचे महत्व जगाला पटवून दिले होते. ‘गौतम बुद्ध’ हे फक्त एक व्यक्तिमत्त्व नाही आहे तर एक अशी ज्योत आहे. जी हजारो वर्षानंतर ही मानवी जीवनाचा सत्यमार्ग प्रकाशित करत आहे आणि येणारा अनंत काल हा दिवा सदैव जळत राहील. त्यांचे विचार, त्यांचे उपदेश आज हि दिशादर्शक आहेत. असे प्रतिपादन त्यांनी केले.

मारोती चहांदे नागपूर प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रमाने चौगानवासी मत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चौगानवासीय जनता उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपस्तंभ फाऊंडेशन चौगानचे अध्यक्ष राकेश लिंगायत, उपाध्यक्ष राजेश चहांदे, सचिव सुरेंद्र मेश्राम, सहसचिव प्रकाश बनकर तसेच दीपस्तंभ फाऊंडेशन चौगानचे सर्व सदस्यगण, बौद्ध समाज चौगान, रमाई महिला मंडळ चौगान, फुलेशाहूआंबेडकर विचार मंच चौगान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चौगान च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.