*रस्ते पूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्या*

36

*रस्ते पूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्या*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे मागणी*

 

*मुंबई मंत्रालयात भेट घेऊन दिले याबाबतचे निवेदन*

 

*दिनांक १६ मे २०२३ मुंबई*

 

*गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांमधील लहान लहान नदी-नाल्यांवर पूलांची आवश्यकता असून अशा भागांमधील रस्त्याचे मजबुतीकरण करणेही आवश्यक आहे. त्याकरिता आपण यापूर्वीही निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात या भागातील रस्ते व पुलांच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याने त्याकरीता लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. रवींद्रजी चव्हाण यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून केली.*