ग्रामपंचायत अमिर्झा येथील सरपंच सोनाली गोकुळदास नागापुरे यांच्या वरील अविश्वास ठरावाचा प्रस्ताव बारगळला.

41

ग्रामपंचायत अमिर्झा येथील सरपंच सोनाली गोकुळदास नागापुरे यांच्या वरील अविश्वास ठरावाचा प्रस्ताव बारगळला..

 

 

विरोधी पक्षाच्या बाजूने फक्त ५ सदस्यांनी सहकार्य केले.

 

फुलचंद वाघाडे / जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.

 

गडचिरोली :- तालुक्यातील ग्रामपंचायत अमिर्झा ता. जि.गडचिरोली येथील सरपंच सोनाली गोकुळदास नागापूरे यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत अमिर्झा येथील 9 सदस्यांपैकी 7 सदस्यांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मा तहसीलदार गणवीर साहेब तहसील कार्यालय गडचिरोली यांच्याकडे सादर केलेला होता. सदरहू प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्यांनी नोटीस तहसीलदारांना देणे अनिवार्य होते. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 35 (२)अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून अविश्वास नोटीसावर विचार करण्याकरिता ग्रामपंचायत अमिर्झा ची विशेष सभा दिनांक १७/५/२०२३ ला दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत अमिर्झा कार्यालय येथे आयोजित केलेली होती. या विशेष ग्रामपंचायत सभेला विद्यमान ९ सदस्यांपैकी सरपंच ग्रामपंचायत अमिर्झा यांच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने ५ ग्रामपंचायत सदस्यांनी हात वर करून मतदान नोंदविले व ही सदस्य संख्या अविश्वास ठराव पारित होण्याकरिता ३/४ सदस्य संख्या आवश्यक होती ती पूर्ण होत नसल्यामुळे तहसीलदार यांनी सदर अविश्वास ठराव फेटाळून लावला.

 

ग्रामपंचायत मध्ये ९ सदस्य असून ४ सदस्य भाजपा पुरस्कृत पॅनलचे व उर्वरित ५ सदस्य काँग्रेस प्रणित पक्षाकडून निवडून आलेले होते . सरपंच पदाचा आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रवर्गासाठी असल्यामुळे ओबीसी महिला सरपंच ही भाजपा प्रणित आघाडीची होती. या सरपंचावर एक महिन्यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सरपंच व अन्य एक सदस्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापडण्यात अडकलेले होते. त्यामुळे त्यांच्या उर्वरित २ महिला ग्रामपंचायत सदस्यांनी तिच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन काँग्रेस प्रणित सदस्यांच्या संपर्कात येऊन आम्ही तुम्हाला सहकार्य करतो परंतु तुम्ही आमच्या सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर करावा आम्ही तुम्हाला पुरेपूर मदत करतो परंतु अमिर्झा गावामध्ये विकासाची कामे झाली पाहिजे असा हेका त्यांनी धरला. परंतु ऐनवेळी अविश्वास ठरावाची खास सभा आयोजित केलेल्या सभेच्या दिवशीच सभेला उपस्थित न राहता शेवटी आपल्याच भाजपा प्रणित पक्षाकडे वळले त्यामुळे सदर सरपंचावरील अविश्वास ठराव बारगडण्यात आला.