*मान.सुधिरभाऊ मुनगंटीवार वने मंत्री तथा पालकमंत्री यांचे हस्ते राज्यातील पहिल्यांदा नवेगाव नागझिरा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पात संवर्धन स्थलांतरण करण्यात आले

66

*मान.सुधिरभाऊ मुनगंटीवार वने मंत्री तथा पालकमंत्री यांचे हस्ते राज्यातील पहिल्यांदा नवेगाव नागझिरा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पात संवर्धन स्थलांतरण करण्यात आले*

———————————————–

दिं. २० मे.२०२३

मान.सुधिरभाऊ मुनगंटिवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यविभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांचे हस्ते आज दिं.२० मे २०२३ ला नवेगाव नागझिरा या व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघाचे संवर्धन स्थलांतरण करण्यात आले.

सदर उपक्रमाअंतर्गत भारतीय वन्यजीव संस्थान चमूच्या मदतीने ब्रह्मपुरी व चंद्रपुर भूभागातील या मादा वाघिणीला नवेगाव नागझिरा या प्रकल्पात वाघाचे स्थलांतरण प्रक्रिया करण्यात आली.

मानव पशु संघर्ष अनेक वर्षापासून सुरू आहे.या संघर्षामध्येवनविभागाला अनेक अडचणीचा सामना करावा लागला.मानव पशु या संघर्षातील उपाय योजना करून या अनुषंगाने राज्यात एकूण लगभग २५ वाघाचे संवर्धन स्थलांतर केल्या जाईल. यामध्ये आज नवेगाव नागझिरा या ठिकाणी राज्यामध्ये पहिल्यांदाच पशू व्याघ्र प्रकल्पात ससंवर्धन स्थलांतर करण्यात आले.

 

या वाघाच्या स्थलांतर प्रक्रियेला उपस्थित गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मान. अशोकजी नेते,खासदार सुनीलजी मेंढे,आमदार विजय रहांगडाले, आमदार मनोहर चंद्रीकापुरे तसेच मोठ्या प्रमाणात वन अधिकारी वर्ग, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी नृत्य परंपरेने स्वागत केले.