138

चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी चिमूरकर मैदानात उतरणार .

चिमूर क्रांती जिल्हा कृती समीतीची बैठक संपन्न

चिमूर …..:- चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे व चिमूर अप्पर जिल्हा कार्यालय सुरू करणे या विषयावर चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीची बैठक हुतात्मा स्मारक चिमूर येथे गजाननजी अगडे यांच्या अध्यक्षते खाली झाली .

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे ,प्रा संजय पिठाडे धनराज मुंगले कृष्ण तपासे बाळकृष्ण बोभाटे रमेश खेरे गजाननजी अगडे रमेश कराळे डॉ हेमंत जांभूळे , अविनाश अगडे मनोज हजारे अविनाश रासेकर प्रफुल कावरे रमेश दडमल सौ लीलाबाई नंदरधने दिवाकर डहारे मोरेश्वर बांबोडे अरुण लाडे पंकज मिश्रा कलिम शेख रामदास हेमके ज्ञानेश्वर जुमनाके गणपत खोबरे आदी उपस्थित होते.

चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर होऊन पदनिर्मिती झाली असताना अप्पर जिल्हाधिकारी सुके यांची नेमणूक झाली असताना महाविकास आघाडी शासन मात्र त्यांना रुजू का करीत नाही यावर शंका व्यक्त करीत चिमूर जिल्हा ब्रम्हपुरी ला जाऊ शकते अशी भीती व्यक्त करीत ब्रम्हपुरीचे तहसीलदार ब्रम्हपुरी जिल्हा संदर्भात अहवाल शासनाला दिले असल्याने शासन केव्हा ही निर्णय फिरवू शकतो असाही सूर व्यक्त करण्यात आले लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो लोकप्रतिनिधी ना पूर्ण पाठींबा देऊन येत्या पंधरा दिवसांत मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आले .

स्थानिक आमदार बंटीभाऊ भांगडीया हे विरोधी पक्षाचे असल्याने त्यांच्या सोबत राहून जनतेचा बुलंद आवाज करून शासनापर्यत पोहचविणे गरजेचे आहे . स्थानिक आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सुद्धा चिमूर क्रांती जिल्हा समिती सोबत ताकदीने राहणार असल्याचे ही सांगण्यात आले.

शासनाच्या नवीन जिल्हा निर्माण अहवालात चिमूर चे नाव असून ५ जानेवारी ला चिमूर क्रांती निर्मितीसाठी निवेदन सतत देत असल्याचे सांगून जनसमर्थन मिळवून अप्पर जिल्हाधिकारी सुरू करण्यासाठी संघर्ष करण्याचे सुद्धा ठरवून येत्या काही दिवसात रणनीती ठरविणार असल्याचे बैठकीत ठरले .