*रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत सुरजगडची वाहतूक बंध करा अन्यथा जण आंदोलन उभारू* —- महेंद्र ब्राम्हणवाडे
गडचिरोली: सुरजागड मध्ये चालणाऱ्या वाहणाची संख्या मोठ्या प्रमानात वाढलेली आहे. त्यामुळेचे आस्टी- आलापल्ली – सिरोंचा महामार्गची दैनिय अवस्था झाली आहे. या जड वाहणामुळे आणि वाहणाच्या स्पीडवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने रोज अपघात होत आहे. अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. हे अपघात रोखण्या करिता रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने वारंवार केली असताना प्रशासण आणि लोकप्रतिनिधी आत्ता पर्यंत उदासीनच असून त्यांनी आता निर्लज्जपनाचा कळस गाठल्याचे जानवते. आजच एका शिक्षकाचा ट्रक खाली येऊन मृत्यू झाला, दोन दिवसापूर्वी एका चिमुकलीचा मृत्यू झाला त्यामुळे हे फक्त अपघात नसून सुरजागडच्या कपंनी मार्फत करण्यात येणारी हत्या आहे, त्यामुळे जो पर्यंत आस्टी – आलापल्ली – सिरोंचा महामार्गचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत सुरजागड प्रकल्पात चालणाऱ्या वाहणाची वाहतूक त्वरित बंद करावी अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.