*वर्धा येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदूंनी “हिंदु राष्ट्रासाठी” संघटित होण्याचा संकल्प केला!* 

41

*वर्धा येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदूंनी “हिंदु राष्ट्रासाठी” संघटित होण्याचा संकल्प केला!*

 

*हिंदू एकता दिंडी’मध्ये 350 हून अधिक हिंदूंचा सहभाग, वर्धा शहर झाले भगवामय*

 

*वर्धा* – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांच्या ८१व्या जन्मोत्सवानिमित्त श्री संतोषी माता मंदिर,शिवाजी चौक जवळ,आर्वी रोड वर्धा          येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. श्री संतोषी मातेच्या आशीर्वादाने 350 हून अधिक हिंदूंनी ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदू राष्ट्रासाठी एकत्र येण्याचा संकल्प केला आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचे व्रत घेतले.

*गुरू परंपरेचे प्रतिनिधीत्व करणारी पालखी* –  हिंदू राष्ट्रावर प्रेरणादायी विचार मांडणारा चित्ररथ,छत्रपती शिवाजी महाराज,झाशीची राणी लक्ष्मीबाई, श्री कृष्ण,श्री राम , श्री हनुमान, श्री राधा, श्री विठ्ठल ह्यांच्या वेशभूषेतील बाल साधक आणि रणरागिणीनी हातात प्रतिकात्मक दंड धरून तसेच दंडयुद्धाचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीच्या वेळी जय श्री राम, हर हर महादेव, जयतु जयतु हिंदु राष्ट्र, जय श्री राम, जय श्री राम,  नावाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी विविध संप्रदायातील भाविकांनी ‘श्री राम जय राम जय जय राम’चा जयघोष करत वातावरणात चैतन्य निर्माण केले. श्री हनुमंत कारेकर, रामदिघी संस्थानाचे अध्यक्ष यांच्या हस्ते ब्रह्मध्वजाचे पूजन करून शंख फुंकून शोभायात्रेला सुरुवात झाली. यात्रेत समाजातील अनेक भाविक पालखीत ठेवलेल्या परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांच्या प्रतिमे पूजन, धर्मध्वजाचे पूजन  आणि पालखीवर पुष्पवृष्टी करत होते. ठिकठिकाणी सुशोभित रांगोळी काढून दिंडीचे स्वागत करण्यात आले. ह्या दिंडीत धर्माभिमानी जेष्ठ नागरिकही सहभागी झाले होते.

या दिंडीत विश्व हिंदू परिषदेचेश्री बाळूभाऊ राजपुरोहित, श्री अनिल कावळे, श्री दिलीप तिवारी, श्री अतुल देशपांडे, बजरंग दल मातृशक्तीच्या सौ कावळे , स्वा. सावरकर प्रतिष्ठानचे श्री श्याम देशपांडे,

राष्ट्रसेविका समिती सौ सुवर्णा काळे, सौ अपर्णा हरदास

श्रीराम मंदिर देवस्थानचे श्री संजीव लाभे, श्री विजय धाबे, श्री संजीव हरदास श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे श्री अनिरुद्ध जोशी, श्री अष्टनकर, श्री परसोडकर, भारतीय जनता पक्षाचे श्री कमल कुलधरिया, श्री जगदीश टावरी धर्मजागरण विभाग

सौ माधुरी मेंढेवार, गायत्री परिवाराच्या श्रीमती राऊत, सौ कविता भांडोपिया, भागवताचार्य सौ.लता दीदी तिवारी, महिला भजनी मंडळ सेलू , बोरगाव ,लहरी नगर,सनातन संस्था , हिंदु जनजागृती समितीचे साधक उपस्थिती होते.

या दिंडीमुळे वर्धेचा संतोषी माता मंदिर परिसर भगवामय झाला होता . दिंडीमुळे लोकांचा सनातन धर्मावरील विश्वास पुन्हा दृढ झाला . ह्या दिंडीचा प्रारंभ श्री संतोषी माता मंदिर शिवाजी चौक जवळ आर्वी रोड पासून तर बढे चौक, श्री देवी अष्टभुजा चौक, पावडे नर्सिंग चौक, करीत शिवाजी चौक येथे शेवट करण्यात आला.

मिरवणुकीच्या पुढे धर्मध्वज, पाठीमागे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांची प्रतिमा असलेली सजवलेली पालखी,विविध संघटनांच्या कार्यकर्त्या, हातात भगवा ध्वज, दंड घेतलेले  धर्मप्रेमी आणि साधक, राष्ट्र पुरुष,देवतांची वेशभूषा केलेले बाल साधकांचा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. समाजातील लोक धर्मध्वज व पालखीला नमस्कार करत होते.

*क्षणचित्रे* :- १. 43℃ उन्हात जेष्ठ नागरिकांनी दिंडीत उस्फुर्त सहभाग नोंदविला होता .

२. धर्मप्रेमी नागरिकांनी दिंडीतील उपस्थित कार्यकर्त्यांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली.

३. श्री देवी अष्टभुजा चौकात ये जा करणाऱ्या नागरिकांनी दिंडीतील घोषणा सुरू असतांना जय श्री राम अश्या घोषणा स्वयंस्फूर्तीने देवून आपला सहभाग दर्शविला.