*मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामसाठी दिल्ली या ठिकाणी सर्व सोयीस्करपणे कामे पूर्ण व मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी खासदार अशोक नेते यांचा पुढाकार*

63

*मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामसाठी दिल्ली या ठिकाणी सर्व सोयीस्करपणे कामे पूर्ण व मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी खासदार अशोक नेते यांचा पुढाकार*

*मार्कंडा देवस्थानाचे काम मार्गी लावण्यासाठी दिल्ली येथील सांस्कृतिक कार्य मंत्रालय येथे बैठक संपन्न!!*

*!!सांस्कृतिक कार्य मंत्री मान. नामदार जी. के. रेड्डी व मा. बासा महानिदेशक उप महानिदेशक जान्हवी जी शर्मा यांची दिल्ली येथे भेट!!*

 

*दिनांक २५ मे २०२३ गडचिरोली*

*मार्कंडा देवस्थानाच्या बांधकामाच्या निविदा संदर्भामध्ये काही अडचणी येत होत्या त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या व पाठपुरावा मिळवण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक जी नेते.यांनी सतत वारंवार पाठपुरावा करीत होते परंतु सदर परवानगी व नाहरकत परवानगी मिळण्यासाठी काही अडचणी येत होत्या परंतु सदर समस्त अडचण खासदार अशोकजी नेते यांनी देशाचे सांस्कृतिक कार्य मंत्री मान.नामदार जी्. के. रेड्डी यांच्या लक्षात आणून दिले व खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने पुरातत्व विभागाचे महा निदेशक मा, बासा साहेब ,उप महानिदेशक जान्हवी जी शर्मा यांच्या उपस्थितीत दिल्ली मंत्रालयात येथे बैठक संपन्न झाली व मंदिर बांधकाम निविदा प्रक्रिया बाबत अडचण दूर झाली मार्कंडा देवस्थानाच्या संदर्भामध्ये सांस्कृतिक कार्य मंत्रालय येथे खासदार अशोक जी नेते यांच्या सूचनेनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये मार्कंडा देवस्थान मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर मार्गी लागावे यासंदर्भात खासदार अशोक जी नेते यांनी देशाचे सांस्कृतिक कार्य मंत्री मान. नामदार जी,के, रेड्डी यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी या बैठकीमध्ये चर्चा केली.त्यामुळे मंदीर बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व समस्या दूर होऊन काही दिवसातच मार्कंडा देवस्थान येथील मंदिर बांधकाम निविदा प्रक्रिया काही दिवसातच पूर्ण होणार आहे. मार्कंडा देवस्थानातील भाविक भक्तांना सुद्धा सोयी सुविधा निर्माण होईल.व महाशिवरात्रीला भावी भक्तांना याचा लाभ निश्चितच होईल. त्यामुळे येथील भक्त जणांनी खासदार अशोक जी नेते यांचे जाहीर आभार मानले आहे*