*विद्यूत महावितरण आल्लापल्ली ला राष्ट्रीय कांग्रेस अहेरी तर्फे निवेदन*.
अहेरी तालूका कांग्रेस पार्टी तर्फे कार्यकारी अभियंता विद्यूत महावितरण आल्लापल्ली यांना निवेदनातून अहेरी हे गाव मूख्य असून पाच ही तालूका चे मूख्य ठिकाण असून अहेरी उप विभाग म्हणून प्रसिद्ध आहे . विविध कार्यालय ,शाळा , कॉलेज, पोलीस उप मूख्यालय , ग्रामीण रूग्णालय, असून सूद्धा ३३/११ के. वी . चे विद्यूत स्टेशन उपलब्ध नाही . ही अहेरी जनते करीता खूपच निंदनीय बाब आहे . कारण विविध शासकीय कामे घेवून जनता अहेरी ला येते. येथे दररोज विद्यूत खंडीत होते . याचे कारण उच्च विद्यूत दाब .कारण प्रत्येक काम डिजीटल सिस्टम मध्ये करायचे असते .परस्थितीनूसार कामे पूर्ण होत नसल्यामूळे जनतेला त्रास सहन करावी. लागते .२०१९ ला ३३/११ के. वी. चे विद्यूत सेवा मिळणार होती परंतु कूठे हरविले आहे . हे गूपीत अजून समजून राहीले नाही. कोराना महामारी मूळे होवू शकले नसेल परंतू आता तरी उपेक्षित जनतेची समस्या अहेरी येथे नवीन ३३/११ के. वी. चे पावर स्टेशन देवून समस्या सोडवावी असे निवेदनातून शासन प्रशासन ला अवगत करण्यात आले .जर लवकरात लवकर समस्यांचे निराकरण होत नसेल तर जन आंदोलन करण्यात येईल . असे इशारा देण्यात आले. डॉ. निसार हकीम ता. अध्यक्ष अहेरी, नामदेव आत्राम किसान सेल अध्यक्ष , रज्जाकभाई उपाध्यक्ष ता. कांग्रेस पार्टी. मधूकर सडमेक ता. अध्यक्ष अनू.जमाती. हनीफभाई शेख अल्पसंख्याक अध्यक्ष अशोक भाऊ आईंचवार अध्यक्ष ग्राहक संरक्षण राघोजी गौरकार ओ. बी. सी. सेल अध्यक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.